SIR Form Online Maharashtr – मतदान यादीत नाव कायम ठेवण्यासाठी SIR फॉर्म ऑनलाइन कसा भरायचा?
Posted on July 26, 2026

Table of Contents
29 जुलै 2026 पर्यंत SIR (Special Intensive Revision) फॉर्म भरणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फॉर्म भरला नाही तर मतदान यादीतून नाव वगळले जाऊ शकते.
What is SIR / Full form of SIR
SIR (Special Intensive Revision)
How to fill sir form
- ECI Net ॲप डाउनलोड करा.
- ॲप इन्स्टॉल करून ओपन करा आणि आवश्यक Permissions द्या.
2002 च्या यादीमध्ये नाव शोधा
- ॲपमध्ये Search Your Name in Last SIR या पर्यायावर क्लिक करा.
- येथे महाराष्ट्र राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून 2002 च्या यादीमध्ये नाव शोधता येते.
- जर स्वतःचे नाव सापडले नाही, तर आई, वडील, आजी किंवा आजोबांचे नाव शोधता येते.
- नाव सापडल्यानंतर त्याचा Screenshot करून ठेवण्यास सांगितले आहे, कारण पुढील प्रक्रियेत त्याची आवश्यकता पडू शकते.
SIR Enumeration Form सुरू करा
- Voter Registration Forms वर क्लिक करा.
- त्यानंतर Special Intensive Revision (SIR) – Fill Enumeration Form Online हा पर्याय निवडा.
जर ॲपमध्ये (Account) नसेल, तर (New User Registration) करून मोबाईल क्रमांक आणि OTP द्वारे Account तयार करावे लागेल.
मतदान कार्डाची माहिती भरा
- महाराष्ट्र राज्य निवडा.
- EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक टाकून माहिती शोधा.
- दाखवलेली माहिती तपासा.
Mobile Number Link to Voter Card
- मतदान कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी संबंधित पर्याय निवडून EPIC क्रमांक भरावा.
- माहिती पडताळल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे पडताळणी पूर्ण करता येते.
SIR Form मधील चार पर्याय
First Option
- 2002 च्या SIR यादीमध्ये स्वतःचे नाव असल्यास हा पर्याय निवडायचा.
Second Option
- स्वतःचे नाव नसून आई, वडील, आजी किंवा आजोबांचे नाव 2002 च्या SIR यादीमध्ये असल्यास हा पर्याय निवडायचा.
Third Option
- 2002 च्या यादीमध्ये नाव नसले, पण 2025-26 च्या यादीमध्ये कुटुंबातील सदस्याचे नाव असल्यास हा पर्याय वापरायचा.
Fourth Option
- वरील कोणत्याही यादीमध्ये नाव नसल्यास स्वतःची आणि कुटुंबातील आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करता येतो.
SIR form Required Information
- जन्मतारीख
- आधार क्रमांक (पर्यायी)
- वडिलांचे नाव
- वडिलांचा EPIC क्रमांक
- आईचे नाव
- आईचा EPIC क्रमांक
- विवाह झाल्यास पती किंवा पत्नीचे नाव आणि EPIC क्रमांक (उपलब्ध असल्यास)
- गावाचे नाव
- नवीन पासपोर्ट साइज फोटो




