Farmer ID Card Download – फार्मर आईडी कार्ड डाउनलोड महाराष्ट्र (Maharashtra)
Posted on August 12, 2026

Table of Contents
शेतकरी मित्रांनो farmer ID बनवून झाला असेल तर मंग आता तो शासकीय कामासाठी download कसा करायचा. थोडक्यात फार्मर ID डाउनलोड कसा करायचा हे आपण बघणार आहोत.
How to Download Farmer ID for maharashtra farmers – फार्मर आईडी कार्ड डाउनलोड कसा करायचा?
सरकारच्या अधिकृत (Official) website वरून आपण हा farmer ID Download करणार आहोत . त्यासाठी खाली दिलेल्या AgriStack वेबसाईट वर जा आणि खालील प्रमाणे माहिती भरा.
वेबसाइट ओपन केल्यानंतर Check Enrollment Status या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर Farmer ID शोधण्यासाठी पर्याय येईल. येथे तुम्ही:
- आधार कार्ड नंबर टाकू शकता.
- Enrollment ID किंवा Farmer ID नंबर उपलब्ध असल्यास तोही टाकू शकता.

आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर Check या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या Farmer ID ची माहिती स्क्रीनवर दिसेल.
Farmer ID मध्ये कोणती माहिती दिसते?
- आधार कार्ड नंबर
- शेतकऱ्याचे नाव
- अर्ज केल्याची तारीख
- Farmer ID Card नंबर
- Registration Active/Approval Status
इथे तुम्हाला तुमचा फार्मर ID दिसलं आणि तुमचं नाव , आधार नंबर. आता तुम्ही क्या page चा screenshot घेऊन download करू शकता आणि शासकीय कामासाठी वापरूशकता.




