महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी
उपयोगी माहिती.
Welcome (Sheti Shala) — महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी योजना, Farmer ID, 7/12, CSC सेवा आणि शेतीविषयक मार्गदर्शन सोप्या भाषेत उपलब्ध करून देणारे माहिती व्यासपीठ. आम्ही सर्व योजनांची माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती Update करत राहतो. आमच्या Website च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. कारण सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती देणे हा आमचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांसाठी माहिती सोपी बनवणे.
माझे नाव Pravin आहे आणि मी शेती शाळा चा Founderआणि YouTuber आहे. योजना मध्ये मी खूप काम केलं आहे. शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मी ह्या website च्या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारी GR, तांत्रिक पोर्टल (जसे Aaple Sarkar, CSC), आणि योजना सामान्य नागरिकांना समजायला कठीण जातात. म्हणूनच, माझ्या डिजिटल अनुभवाचा वापर करून या सर्व प्रक्रिया सोप्या मराठीत आणि इंग्रजीत उपलब्ध करून देणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
आम्ही कोणत्या विषयांवर माहिती देतो?
सरकारी योजना
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, लाभ, पात्रता, आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
Farmer ID (AgriStack)
Farmer ID संबंधित प्रक्रिया, e-KYC नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, आणि स्थिती तपासणीचे मार्गदर्शन.
7/12 उतारा व महसूल
डिजिटल 7/12 उतारा, 8A, ई-पीक पाहणी (E-Pik Pahani) आणि जमिनीच्या नोंदी पाहण्याची प्रक्रिया.
CSC केंद्र सेवा
CSC केंद्रांमधून मिळणाऱ्या सेवा, तांत्रिक त्रुटी (Error Solutions), आणि फिंगरप्रिंट बायोमेट्रिक मार्गदर्शन.
शेती व तांत्रिक मार्गदर्शन
स्मार्टफोनवरून शेतीची कामे कशी करावीत, आणि नवनवीन डिजिटल अपडेट्सची (GR) सविस्तर माहिती.
स्वतंत्र माहिती व्यासपीठ (Independent Website)
शेती शाळा ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही आणि कोणत्याही सरकारी विभाग, मंत्रालय किंवा CSC संस्थेशी आमचा अधिकृत संबंध नाही.
येथे दिलेली सर्व माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने (Educational Purposes) प्रकाशित केली जाते. कोणतीही योजना किंवा प्रक्रिया वापरण्यापूर्वी संबंधित अधिकृत सरकारी पोर्टलवरील माहिती तपासणे आवश्यक आहे.
काही सूचना किंवा दुरुस्ती आहे?
माहितीमध्ये काही चूक आढळल्यास किंवा संपर्क साधायचा असल्यास खालील पर्यायांचा वापर करा.
