चारा लागवड अनुदान योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले असून, 2026-27 या वर्षासाठी अधिक शेतकऱ्यांना चारा लागवडीचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत पूर्वी पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्याने लाभ दिला जात होते. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनाही चारा लागवड करता येणार आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ₹4,000 अनुदान, तर शेतकरी गटांसाठी प्रति गट ₹20,000 पर्यंत अनुदान मिळणार.
विशेष म्हणजे, एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त वेळा चारा लागवड करून योजनेचा लाभ घेण्याची तरतूदही आहे. त्यामुळे चारा लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे.
चारा लागवड अनुदान योजना म्हणजे काय?
राज्यात ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत वैरण उत्पादन कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, त्याच कार्यक्रमांतर्गत चारा बियाणे अनुदान योजना राबवली जाते.
चाऱ्याची उपलब्धता वाढावी आणि चारा लागवडीचे क्षेत्र वाढावे, या उद्देशाने या योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे.
चारा बियाणे योजना अनुदान किती ?
| वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी अनुदान | प्रति हेक्टर ₹4,000 |
| शेतकरी गटांसाठी अनुदान | प्रति गट ₹20,000 पर्यंत |
| पाण्याची उपलब्धता | आवश्यक |
ज्या शेतकऱ्यांकडे चारा लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे. या बदलामुळे पशुधन असलेल्या शेतकऱ्यांबरोबरच पाण्याची उपलब्धता असलेल्या अधिक शेतकऱ्यांना चारा लागवड करण्याची संधी मिळू शकते.
Chara Biyane Yojana New GR Details


योजनेच्या महत्त्वाच्या अटी
- शेतकऱ्याकडे चारा लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक
- प्रथमच योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे.
- वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गटांसाठी अनुदानाची स्वतंत्र मर्यादा आली आहे.
- एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त वेळा लाभ घेण्याची तरतूद आहे.
एका शेतकऱ्याला दोन वेळा चारा लागवड केल्यास किती अनुदान मिळेल?
एखाद्या शेतकऱ्याने एक हेक्टर क्षेत्रावर दोन वेळा चारा लागवड करण्याचा विचार केला, तर त्याला एकूण ₹8,000 पर्यंत अनुदान मिळू शकते.
| चारा लागवडीचा तपशील | अनुदान |
| एक हेक्टरवर एक वेळ लागवड | ₹4,000 |
| एक हेक्टरवर दोन वेळा लागवड | ₹8,000 पर्यंत |
चारा बियाणे योजना अर्ज कसा करायचा?
योजनेसाठी अर्ज संबंधित पंचायत समितीच्या माध्यमातून मागवले जाणार आहेत.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पुढील गोष्टी कराव्यात:
- आपल्या गावातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा.
- चारा लागवड अनुदान योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत का, याची माहिती घ्या.
- तुमच्याकडे चारा लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता असल्यास योजनेच्या अटी तपासा.
- अर्ज सुरू झाल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या सूचनेनुसार अर्ज सादर करा.
- अनुदानासाठी लागू असलेली पात्रता, कागदपत्रे आणि मर्यादा अधिकाऱ्यांकडून निश्चित करून घ्या.



Leave a Reply