शेती शाळा • महाराष्ट्र कृषी योजना, पीक सल्ला व CSC सेवा पोर्टल
शेती शाळा
SHETI SHALA
शेती शाळा • कृषी व योजना पोर्टल
सरकारी योजना
⏱️ 5 मिनिटे वाचन वाचण्याचा वेळ

जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन काढा: Jeevan Pramaan Life Certificate

Pravin
प्रमाणित कृषी व CSC मार्गदर्शक
📅 प्रकाशित: 12 October 2026

हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र किंवा Life Certificate मोबाईलवरून कसा काढायचा? हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र किंवा Life Certificate हे पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे असते. वर्ष संपत आल्यानंतर पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. आणि आता त्यासाठी कुठेच बाहेर जाण्याची गरज नाही कारण Jeevan Pramaan App आणि Aadhaar Face RD App यांच्या मदतीने मोबाईलवरून घरबसल्या Face Authentication करून जीवन प्रमाणपत्र तयार करता येते.

जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय ? Jeevan Pramaan kay ahe ?

हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate). पेन्शनधारकाची हयात असल्याचे प्रमाणित करण्यासाठी या प्रमाणपत्राचा वापर केला जातो.

Jeevan Pramaan App च्या मदतीने पेन्शनधारकाचे Face Authentication करून जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. त्यानंतर मिळालेल्या Pramaan ID च्या मदतीने Pensioner Login करून Life Certificate डाउनलोड करता येते.

हयातीत प्रमाणपत्र कास काढायचं ? Jeevan Pramaan Online Apply?

ही प्रक्रिया मोबाईलवर करण्यासाठी Play Store वरून खालील दोन ॲप्स इन्स्टॉल करा.

1. Jeevan Pramaan App – जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी Jeevan Pramaan ॲप वापरायचे आहे.

2. Aadhaar Face RD App – Face Authentication साठी Aadhaar Face RD ॲप इन्स्टॉल करा.

  • सर्वप्रथम Play Store उघडा. तेथे Jeevan Pramaan शोधून ॲप इन्स्टॉल करा. त्यानंतर Aadhaar Face RD शोधून तेही इन्स्टॉल करा. दोन्ही ॲप्स इन्स्टॉल झाल्यानंतर Jeevan Pramaan ॲप उघडा.
  • Jeevan Pramaan ॲप उघडल्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अशी माहिती भरण्याचा पर्याय दिसतो.
  • या सुरुवातीच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक माहिती भरून Submit करा. त्यानंतर मोबाईलवर OTP येईल. OTP टाकून पुन्हा Submit करा.
  • OTP सबमिट केल्यानंतर Operator Name विचारले जाईल. येथे ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक वापरला आहे, त्या व्यक्तीचे नाव टाका. त्यानंतर दिलेल्या बॉक्सवर टिक करा आणि Scan बटनावर क्लिक करा.

Face Authentication पूर्ण करा

  • Scan केल्यानंतर Aadhaar Face RD उघडण्याची सूचना येऊ शकते. ती स्वीकारून पुढे जा.
  • स्क्रीनवर गोल आकार दिसेल. ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक वापरला आहे, त्या व्यक्तीचा चेहरा या गोलामध्ये ठेवा. चेहरा स्पष्ट दिसेल अशा प्रकारे समोर पाहा आणि सूचनेनुसार डोळ्यांची उघडझाप करा.
  • प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर Operator Registration पूर्ण होते. त्यानंतर पेन्शनधारकाचे जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पुढे जाता येते.

Pensioner Identification करा

  • Operator Registration पूर्ण झाल्यानंतर Pensioner Identification हा भाग दिसेल.
  • ज्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढायचा आहे, त्या पेन्शनधारकाचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरा. त्यानंतर Submit करा.
  • पेन्शनधारकाच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP भरून पुन्हा Submit करा.

पेन्शनधारकाची माहिती तपासा

  • OTP सबमिट केल्यानंतर पेन्शनधारकाची माहिती स्क्रीनवर दिसू शकते. यामध्ये पेन्शनधारकाचे नाव आणि पेन्शनशी संबंधित माहिती दिसते.
  • जर माहिती दिसत नसेल, तर स्क्रीनवर उपलब्ध असलेला PPO Number निवडण्याचा पर्याय तपासा. आवश्यक असल्यास PPO Number किंवा संबंधित Agency ची माहिती जोडावी लागू शकते.
  • माहिती भरल्यानंतर सर्व तपशील योग्य आहेत का ते तपासा. त्यानंतर आवश्यक पर्याय निवडून Next करा.

माहिती प्रमाणित करा

  • पुढील स्क्रीनवर पेन्शनधारकाची माहिती पुन्हा दिसेल. नाव आणि इतर तपशील योग्य आहेत का ते काळजीपूर्वक तपासा.
  • त्यानंतर “I Certify That” या मजकुराखाली दिलेल्या दोन्ही बॉक्सवर टिक करा आणि Submit करा.

पेन्शनधारकाचे Face Authentication करा

  • आता पुन्हा Face Authentication करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
  • सूचना स्वीकारा, Scan बटनावर क्लिक करा आणि ज्या पेन्शनधारकाचा हयातीचा दाखला काढायचा आहे, त्यांचा चेहरा स्कॅन करा. स्क्रीनवरील सूचनेनुसार डोळ्यांची उघडझाप करा.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जीवन प्रमाणपत्र तयार झाल्याचा संदेश दिसेल. यासोबत Pramaan ID मिळेल.

Note: महत्त्वाची सूचना: Pramaan ID चा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा ID पुढे Life Certificate डाउनलोड करण्यासाठी उपयोगी पडेल. मेसेजमध्येही हा ID मिळू शकतो.

Jeevan Pramaan Life Certificate Download कसे करायचे?

जीवन प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर ते डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा.

Pensioner Login वेबसाइट उघडा

Jeevan Pramaan अधिकृत वेब्सिते ओपन करा.

Pramaan ID टाका

  • जीवन प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर मिळालेला Pramaan ID टाका. हा ID तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये सेव्ह केला असेल किंवा मेसेजमध्ये मिळालेला असेल.
  • त्यानंतर स्क्रीनवर दिलेला CAPTCHA भरा आणि Generate OTP वर क्लिक करा.

OTP टाकून Login करा

  • पेन्शनधारकाच्या मोबाईलवर आलेला OTP टाका. CAPTCHA भरून Login करा.

Life Certificate Download करा

  • Login झाल्यानंतर Download Life Certificate किंवा त्यासंबंधीचा पर्याय दिसेल. स्क्रीनवर दिलेल्या हिरव्या बटनावर किंवा Click Here पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच Jeevan Pramaan Life Certificate डाउनलोड करता येईल.

WhatsApp Group नवीन अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवा
Join Now

⚠️ अस्वीकरण (Disclaimer)

Sheti Shala (Proranker.in) हे एक स्वतंत्र आणि खाजगी शैक्षणिक ब्लॉग आहे. याचा कोणत्याही सरकारी विभागाशी, महाडीबीटी (MahaDBT) किंवा CSC पोर्टलशी अधिकृत संबंध नाही. आम्ही दिलेली सर्व माहिती अधिकृत GR आणि वृत्तपत्रांच्या आधारे वाचकांच्या सोयीसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी कृपया संबंधित योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर माहितीची खात्री करा.

संबंधित विषय (Tags):

Pravin - ProRanker Author

Pravin

महाराष्ट्र कृषी व CSC डिजिटल सेवा मार्गदर्शक

लेखक

ProRanker.in आणि Sheti Shala वर शासकीय योजना, कृषी सेवा, Farmer ID, MahaDBT, 7/12 आणि डिजिटल सरकारी सेवांची माहिती सोप्या भाषेत मांडतात. Digital content creation मध्ये 5+ वर्षांचा अनुभव.

कृषी शासकीय योजना Farmer ID MahaDBT CSC सेवा
✓

या लेखातील माहिती संबंधित अधिकृत स्रोतांच्या आधारे तपासून आणि वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली जाते.

आमच्या शेतकरी कुटुंबात सामील व्हा! 🌾

सरकारी योजना, पीक विमा, आणि कृषी विषयक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. हा लेख इतर बांधवांना शेअर करायला विसरू नका.

याच कॅटेगरीमधील महत्त्वाचे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *