Gopinath Munde Shetkari Apghat Yojana 2026: Online अर्ज कसा करायचा?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेसाठी MahaDBT Farmer Login मधून Online अर्ज कसा करायचा, कोणती माहिती भरायची आणि कोणती कागदपत्रे अपलोड करायची ते या लेखातून पाहूया.
शेती करताना वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, पुराच्या पाण्यात वाहून जाणे, विजेचा धक्का, रस्ता अपघात किंवा इतर अपघातामुळे शेतकरी किंवा कुटुंबातील सदस्याला मोठी दुर्घटना झाली तर पुढे काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा, MahaDBT वर कोणती माहिती भरायची आणि कोणती कागदपत्रे अपलोड करायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Gopinath Munde Shetkari Apghat Yojana म्हणजे काय?
शेती करत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक प्रकारचे अपघात होऊ शकतात. यामध्ये वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, पुराच्या पाण्यात वाहून जाणे, विजेचा धक्का, रस्ता अपघात तसेच इतर नैसर्गिक अपघातांचा समावेश आहे.
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला ₹2 लाखांची मदत मिळते.
शेतकरी किंवा कुटुंबातील सदस्याचा अपघात झाल्यासही ₹2 लाखांची मदत मिळू शकते. एका पायाला किंवा एका हाताला अपंगत्व आल्यास ₹2 लाख, तर काही सामान्य अपंगत्वाच्या परिस्थितीत ₹1 लाख मदत.
MahaDBT Farmer Login मधून Online अर्ज
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाइन अर्ज MahaDBT Farmer Login मधून करता येतो.
1. MahaDBT वर Farmer Login कसे करायचे?
वैयक्तिक शेतकरी निवडा
MahaDBT Farmer Login पेजवर गेल्यानंतर “वैयक्तिक शेतकरी” हा पर्याय निवडा.
Farmer ID टाका
Farmer ID टाका आणि OTP मिळवण्यासाठी Send OTP करा. Farmer ID माहीत नसेल तर खाली दिलेल्या पर्यायातून Farmer ID शोधता येतो.
OTP तपासा
मोबाईलवर आलेला OTP टाका आणि “OTP तपासा” या पर्यायावर क्लिक करा.
येथे आई, वडील, मुलगा, मुलगी किंवा कुटुंबातील इतर सदस्याचा Farmer ID वापरता येतो.

2. पहिल्यांदा Login केल्यानंतर Profile पूर्ण करा
– पहिल्यांदा Login करताना Profile मध्ये काही माहिती भरावी भरावी लागेल. यामध्ये “जात श्रेणी” हा पर्याय निवडून आपली caste category निवडायची आहे.
– SC/ST असल्यास caste certificate upload करण्याचा पर्याय येतो. इतरांसाठी Other हा पर्याय निवडता येतो.
– त्यानंतर Personal Disability मध्ये Yes किंवा No निवडायचे आहे. Yes असल्यास disability certificate upload करायचे आहे.
– माहिती Save केल्यानंतर Profile 100% झाल्याचे दिसते.
3. Bank Details भरायची असल्यास काय करायचे?
– पहिल्यांदा Login करताना Bank Details आवश्यक आहे Bank Account Number आणि IFSC Code भरायचा आहे.
– माहिती Save करून ती Confirm करायची आहे.
4. “घटकासाठी अर्ज करा” पर्याय निवडा
– Profile आणि आवश्यक माहिती पूर्ण केल्यानंतर डाव्या बाजूला “घटकासाठी अर्ज करा” हा पर्याय दिसतो.
– त्यामध्ये “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना” हा घटक शोधायचा आहे.
– त्यानंतर “बाबी निवडा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

5. अर्जदाराचा प्रकार निवडा
– यानंतर District, Taluka आणि Village ची माहिती दिसते.
– “अर्जदाराचा प्रकार” या ठिकाणी परिस्थितीनुसार पर्याय निवडायचा आहे.
– स्वतः शेतकरी जमीनधारक शेतकऱ्याचा मृत्यू, अपघात किंवा अपंगत्व असल्यास संबंधित पहिला पर्याय निवडायचा आहे.
– कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, अपघात किंवा अपंगत्व असल्यास संबंधित दुसरा पर्याय निवडायचा आहे.
6. अपघाताचा प्रकार निवडा
– त्यानंतर अपघाताचा प्रकार निवडायचा आहे.
– येथे अपंगत्व किंवा मृत्यू यापैकी लागू असलेला पर्याय निवडायचा आहे.
7. अर्जदाराचे नाते निवडा
– अपघातग्रस्त शेतकऱ्याशी अर्जदाराचे नाते निवडायचे आहे.
– यामध्ये अविवाहित मुलगी, आई, पत्नी, मुलगा, वडील इत्यादी उपलब्ध पर्यायांमधून लागू असलेला पर्याय निवडायचा आहे.
8. अपघातग्रस्त शेतकऱ्याची माहिती भरा
– त्यानंतर अपघातग्रस्त शेतकऱ्याची माहिती भरायची आहे.

9. अपघाताचे स्वरूप निवडा
– अपघाताचे स्वरूप निवडताना अर्जामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून संबंधित पर्याय निवडायचा आहे.
– यामध्ये रस्ता अपघात, रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विजेचा धक्का, वीज पडणे, हत्या, उंचावरून पडणे, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवादी हल्ला, प्राणी हल्ला किंवा चावा, दंगल इत्यादी पर्यायांचा समावेश असल्याचे या प्रक्रियेत दिसते.
– आपल्या प्रकरणाला लागू असलेला अपघाताचा प्रकार निवडायचा आहे.
10. Accident Date आणि Death Date
– त्यानंतर Accident Date आणि लागू असल्यास Death Date भरायची आहे.
– अपघाताच्या वेळी संबंधित व्यक्ती वाहन चालवत होती का, यासाठी Yes किंवा No हा पर्याय निवडायचा आहे.
11. Bank Account Details
– अर्जामध्ये Bank Account Number आणि IFSC Code भरायचा आहे.
– कुटुंबातील सदस्याच्या Bank Account चा वापर करता येतो.
12. Gopinath Munde Shetkari Apghat Yojana Documents
– अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे निवडून ती upload करायची आहेत. या प्रक्रियेत कागदपत्रे संबंधित field नुसार मागितली जातात.

13. Family Consent Letter आणि Declaration
Family Consent Letter आवश्यक असल्यास ते Affidavit वर करता येते. त्यासाठी दिलेल्या prescribed format चा वापर करता येतो.
तसेच अर्जामध्ये prescribed format undertaking देखील upload करायचे आहे.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Ghoshnapatra
घोषणापत्र / prescribed format पाहण्यासाठी खालील लिंक वापरा.
घोषणापत्र पाहा14. कागदपत्रे Upload करून अर्ज Submit करा
– आवश्यक माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रे upload करायची आहेत.
– त्यानंतर दिलेले दोन्ही checkbox tick करून terms स्वीकारायच्या आहेत.
– सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करून अर्ज submit करायचा आहे.
Farmer Details, Accident Details, Bank Details आणि Upload केलेली कागदपत्रे एकदा तपासून मगच अर्ज Submit करा.
Gopinath Munde Shetkari Apghat Yojana Online Apply Flow
MahaDBT Farmer Portal
अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी MahaDBT Farmer Login वापरता येईल.
Gopinath Munde Shetkari Apghat Yojana FAQ
निष्कर्ष
Gopinath Munde Shetkari Apghat Yojana साठी Online अर्ज करताना सर्वप्रथम MahaDBT Farmer Login करायचे आहे. Farmer ID आणि OTP वापरून Login केल्यानंतर Profile मधील आवश्यक माहिती पूर्ण करायची, Bank Details भरायचे आणि “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायातून संबंधित योजना निवडायची आहे.
त्यानंतर अर्जदाराचा प्रकार, अपघाताचा प्रकार, नाते, अपघातग्रस्त शेतकऱ्याची माहिती, अपघाताचे स्वरूप, तारीख, Bank Details आणि आवश्यक कागदपत्रे भरून Upload करायची आहेत.
शेवटी आवश्यक checkbox निवडून अर्ज Submit करायचा आहे. त्यामुळे अर्ज भरताना प्रत्येक माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे.



Leave a Reply