शेती शाळा • महाराष्ट्र कृषी योजना, पीक सल्ला व CSC सेवा पोर्टल
शेती शाळा
SHETI SHALA
शेती शाळा • कृषी व योजना पोर्टल
सरकारी योजना
⏱️ 29 मिनिटे वाचन वाचण्याचा वेळ

Mahila Shetkari Praman Patra : 2026: Online अर्ज, पात्रता, कागदपत्रे

Pravin
प्रमाणित कृषी व CSC मार्गदर्शक
📅 प्रकाशित: 20 September 2026
🔄 अपडेट: 18 October 2026

PRORANKER • COMPLETE GUIDE

महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026: Online अर्ज, पात्रता, कागदपत्रे, फायदे, Status Check आणि Download

महिला शेतकरी प्रमाणपत्रासंबंधी अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, नवीन GR, फायदे, अर्जाची स्थिती तपासणे आणि प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची माहिती एकाच ठिकाणी.

Mahila Shetkari Certificate 2026

महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026

महिलांसाठी आता महिला शेतकरी प्रमाणपत्र आलेले आहे आणि यासाठी Online अर्ज सुरू झालेले आहेत. हे प्रमाणपत्र विविध योजना, बचत गट, पीक विमा, अनुदान आणि कर्ज सुविधांसाठी महत्त्वाचे असणार आहे.

महिला शेतकऱ्यांना शासकीय नोंद, ओळख, कृषी योजनांमधील लाभ, सबसिडी आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्राबाबत माहिती.

Application
Online / Offline अर्ज
Verification
Aadhaar OTP
Important ID
Farmer ID
Status
Track Application

महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे काय?

महिलांना शेतकरी म्हणून शासकीय नोंद किंवा ओळख मिळत नाही हीच अडचण ओळखून ती दूर करण्यासाठी कृषी विभागाने महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

जर शेत सातबारा उताऱ्यावर नाव असेल तर किंवा कुटुंबातील शेत जमिनीवर महिला खातेदार किंवा सहखातेदार असतील तर हे प्रमाणपत्र मिळवणे अगदी सहज मिळवता येते.

महिलांसाठी नवीन कायदा आलेला आहे. त्या अंतर्गत महिलांना आता शेतकरी प्रमाणपत्र मिळणार आहे. पीक विमा योजना असेल, अनुदानाच्या योजना असतील, कर्ज सुविधा असतील या सर्वांसाठी आता महिला शेतकरी प्रमाणपत्र महिलांकडे असणं गरजेचं आहे.

Mahila Shetkari Pramanpatra Eligibility — कोणाला मिळणार प्रमाणपत्र?

सर्वात पहिल्यांदा जाऊन “पात्रता तपासा” या बटनावर क्लिक करायचे आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्र सरसकट सगळ्या महिलांना मिळणार नाही. त्यामुळे सर्वच महिलांनी अर्ज करू नका, आधी याची पात्रता व्यवस्थित समजून घ्या. नवीन जीआर (GR) आलेला असून त्यात याबद्दल स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

01

ग्रामपंचायत आणि नगरपंचायत क्षेत्रातील महिलांनाच पात्रता

नवीन जीआरनुसार, जर तुम्ही ग्रामपंचायत (Gram Panchayat) किंवा नगरपंचायत (Nagar Panchayat) क्षेत्रातील महिला असाल, तरच तुम्ही या प्रमाणपत्रसाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला ते मिळण्यास पात्र आहात.

02

नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना नाकारले

जर महिला नगरपालिका, महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रातील असेल, तर ती या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही आणि त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार नाही. याचा स्पष्ट उल्लेख नवीन जीआरमध्ये करण्यात आला आहे.

03

वय व रहिवासी निकष

अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आणि तिच्याकडे वैध आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

तुम्ही पात्र आहात जर अर्जदार महिला असावी आणि ती:

  • जमीन मालक असावी
  • वेदकूळ असेल
  • वाटेकरी असेल
  • भाडेकरू असेल
  • शेत मजूर असेल
  • बटाईदार म्हणून शेतीमध्ये सक्रिय असेल
महिला शेतकरी असण्याची व्याख्या:
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिला ही शेतकरी हवी. याचा अर्थ, जर महिलेच्या नावावर सातबारा (7/12) असेल तरी चालेल; परंतु जर सातबारा नसेल आणि ती शेतात मजुरी करत असेल किंवा शेतात सक्रियपणे काम करत असेल, तरीसुद्धा ती महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरणार आहे.
Mahila Shetkari Pramanpatra New GR Link https://drive.google.com/file/d/1QLFpz-bFA2qnb1HvM8vCZ2OcHqrUnSrm/view?pli=1
नवीन जीआर डाऊनलोड करा →
Eligibility Check

पात्रतेचे निकष तपासा

Mahila Shetkari Eligibility Portal Screenshot

Mahila Shetkari Certificate चे फायदे

हे प्रमाणपत्र काढल्यामुळे महिला शेतकऱ्यांना कोणते विशेष फायदे होतात आणि कोणत्या सवलती मिळतात ते थोडक्यात पाहूयात:

01
30% आरक्षणाचा लाभ

शासकीय योजनांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून बहुतांश योजनांमध्ये 30% आरक्षणाचा लाभ मिळतो. उदाहरणात MahaDBT मध्ये अवजारे, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांचा समावेश आहे. महिलांसाठी 30% निधी आणि आरक्षण राखीव असते.

02
अतिरिक्त Subsidy आणि अनुदान

हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जास्त सबसिडी अनुदान अनेक कृषी योजनांमध्ये सामान्य शेतकऱ्यापेक्षा महिलांना 10 ते 20% अतिरिक्त सबसिडी ही दिली जाते.

03
Bank Loan आणि Micro Finance

त्यानंतरच म्हणजेच बँक कर्ज व सूक्ष्म वित्त पुरवठा सोपा होतो. शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय असो, कुकुटपालन असो, शेळीपालन असो, बँक कर्ज मिळवताना हे प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त ठरते.

04
महिला बचत गट आणि FPO साठी उपयोग

महिला बचत गट किंवा कृषी व्यवसाय प्रोत्साहन महिला शेतकरी गट किंवा एफपीओ (FPO) स्थापन करून शासकीय अनुदानाचा लाभ घेणे अगदी सोपे होते कारण या प्रमाणपत्र असल्यामुळे हे सर्व प्रक्रिया सोपी होते.

05
महिलांना शेतकरी म्हणून प्रशासकीय ओळख

महिलांना सन्मान आणि ओळख यामुळे या प्रमाणपत्रामुळे महिलांना अधिकृतपणे शेतकरी म्हणून प्रशासकीय ओळख मिळते.

महिला शेतकरी प्रमाणपत्र कशासाठी लागेल?

पीक कर्ज
बचत गट
कौशल्य प्रशिक्षण
आधुनिक कृषी तंत्र मार्गदर्शन
बाजारपेठ
साठवणूक
वाहतूक
पीक विमा
अनुदानाच्या योजना
बियाणे
खते
शेती साहित्य योजना
विधवा महिला शेतकरी
घटस्फोटीत महिला शेतकरी
एकल महिला शेतकरी

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे (Documents)

तुम्ही अर्ज तर सगळे करत आहात, पण लक्षात ठेवा की ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेमध्ये (किंवा बैठकीमध्ये) ठराव मंजूर झाल्यानंतरच प्रमाणपत्र डाउनलोड करता येते. त्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतात:

  • आधार कार्ड (Aadhaar Card): महिलेचे मूळ आधार कार्ड आणि 12 अंकी Aadhaar Number.
  • मोबाईल नंबर: Aadhaar ला Link असलेला Mobile Number (OTP साठी).
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जमिनीचा पुरावा: जमिनीचा चालू वर्षांचा सातबारा आणि आठव उतारा ज्यात महिलेचे नाव असावे.
  • पासबुकची सत्यप्रत: जो काही लाभ असेल तो Aadhaar संलग्न Bank Account मध्ये जमा होईल.

रहिवासी पुरावा म्हणून वापरता येणारे पर्याय:

Ration Card

रहिवासी पुराव्यासाठी वापरता येणारा पर्याय.

Voting Card

मतदान कार्ड नसेल तर वीज बिल किंवा रेशन कार्ड चालते.

Light Bill

रहिवासी पुराव्यासाठी वापरता येणारा पर्याय.

रहिवाशी दाखला

ग्रामपंचायत दाखला किंवा मूळ रहिवासी प्रमाणपत्र.

Mahila Shetkari Documents Screenshot

📄 Document Readiness Checker

Before applying on Aaple Sarkar, verify you have all mandatory documents ready.

Mahila Shetkari Certificate Online Apply | प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया

हे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. दोन पद्धती आहेत ऑफलाईन पद्धत आणि ऑनलाईन पद्धत.

Offline Method

ऑफलाईन पद्धत

ऑफलाईन पद्धतीमध्ये तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुक्याचा कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तुमचा आजार सादर करून हे प्रमाणपत्र मिळवू शकता.

Online Method

ऑनलाईन पद्धत

ऑनलाईन पद्धत पाहिली तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पोर्टलवर शेतकरी योजनेच्या पोर्टलवर किंवा आपले सहकार केंद्र या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून प्रमाणपत्र मिळवता येतील.

आता Online अर्ज नक्की कसा करायचा ते पाहूया:

1
Apply Now वर क्लिक करा

सर्वप्रथम Apply Now या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर महिला शेतकरीसाठी अर्ज करा असा Form Open होईल.

Application Form Screenshot

Mahila Shetkari Certificate Apply Form

खालील screenshot मध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या Online Form मधील सुरुवातीचे fields दिसत आहेत. पोर्टल वर Aadhaar नुसार पूर्ण नाव, Aadhaar Number, District, Taluka, Village, OTP, Mobile Number, Caste Category आणि Type of Agricultural Work यांसारखी माहिती भरायची आहे.

Mahila Shetkari Certificate Online Apply Form Screenshot
2
पूर्ण नाव व Aadhaar Number

पूर्ण नाव आधारनुसार टाकायचे आहे. Aadhaar Card वर जसे नाव आहे तसे English मध्ये नाव टाकायचे आहे. आणि 12 अंकी Aadhaar Number टाकायचा आहे.

3
District, Taluka, Village

तुम्ही जिथे राहता तो District Select करायचा आहे. तुमचा Taluka Select करायचा आहे. आणि तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते Village Select करायचे आहे.

4
Aadhaar OTP Verification

Basic information भरल्यानंतर OTP पाठवा बटनावर क्लिक करायचे आहे. OTP पाठवण्यापूर्वी तुमचे नाव, Aadhaar Number, District आणि Taluka व्यवस्थित भरलेले आहेत याची खात्री करायची आहे. Aadhaar ला जो Mobile Number Link असेल त्यावर 6 अंकी OTP जाईल. आलेला 6 अंकी OTP येथे टाकायचा आणि OTP Verify करा / सत्यापित करा बटनावर क्लिक करायचे.

5
Permanent Address आणि Current Address

OTP Verify झाल्यानंतर तुमचा Photo, Name, Birth Date आणि Address यासह माहिती Automatically येणार आहे. आता खाली विचारले जाईल: “वर दिलेला कायमचा पत्ता हाच तुमचा सध्याचा पत्ता आहे का?” कायमचा पत्ता हाच सध्याचा पत्ता असेल तर ‘होय’ Select करा. नसेल तर ‘नाही’ Select करून सध्याचा पत्ता टाका.

6
Mobile Number आणि Caste Category

त्यानंतर खाली तुमचा Mobile Number येथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या Category मध्ये येता (General, OBC, SC, ST, VJNT, SBC) ते तुमच्या Category नुसार योग्य पर्याय Select करून घ्यायचा आहे.

7
Type of Agriculture Work काय निवडायचे?

कोणतीही महिला काय काम करते, म्हणजे तिचा Type of Agriculture Work Select करायचा आहे. महिलेला शेतीमध्ये कोणते काम येते किंवा ती कोणते काम करते त्यानुसार एक किंवा एकापेक्षा जास्त पर्याय निवडता येतात.

पीक लागवड
बियाणे उत्पादन
पशुपालन
मत्स्य व्यवसाय
पशु संवर्धन
मधमाशी पालन
मत्स्य पालन
दूध व्यवसाय
फूल शेती
चारा लागवड
फलो उत्पादन
कुक्कुटपालन
रेशमी शेती
गांडूळ खत निर्मिती
वनस्पती संकलन व विक्री
शेतमालावर प्रक्रिया
भाड्याने शेती
वाट्याने शेती
स्थलांतरित स्वरूपातील शेती
शेत मजूर
8
कुटुंबातील सदस्याकडे Farmer ID आहे का?

यानंतर विचारले जाईल: “कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे Farmer ID आहे का?” जर घरामध्ये कोणाकडे Farmer ID असेल तर 11 अंकी Farmer ID येथे टाकायचा आहे आणि Verify करून घ्यायचा आहे. (Farmer ID Mandatory नाही, प्रक्रियेमध्ये महिलांना शेतकरी दर्जा देण्यात येणार आहे). जर Farmer ID नसेल तर डायरेक्ट नाही Select करून या Box वर Tick करून अर्ज Submit करता येतो.

9
महिला शेतकरी प्रमाणपत्र Application Submit

अशा पद्धतीने संपूर्ण Form भरल्यानंतर “अर्ज सादर करा / Submit Application” बटनावर क्लिक करायचे आहे. अर्ज Successfully Submit झाल्यानंतर तुमचा अर्ज Submit झालेला दिसेल आणि Acknowledgement Number मिळेल.

Acknowledgement Number Save करून ठेवा:
हा नंबर भविष्यात Certificate Download करण्यासाठी लागणार आहे.
Mahila Shetkari Service Portal uat-mahakrishi.mahaitgov.in
Online Apply करा →

Mahila Shetkari Application Status Check

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करून झाल्यानंतर त्या अर्जाची स्थिती मोबाईलवरून कशी पाहायची? पोचपावती क्रमांक किंवा अर्जदाराचे नाव वापरून Application Status Check करण्याची प्रक्रिया येथे पाहूया.

प्रमाणपत्र कधी व कसे मिळणार?:
Online अर्ज केल्यानंतर शेती किंवा शेतीशी निगडित काम करणारी कोणती महिला यासाठी अर्ज करू शकते. त्यानंतर ग्रामसभेची पडताळणी होणार आहे. पुढील ग्रामसभेमध्ये किंवा नगरपंचायतीच्या बैठकीमध्ये अर्जावर विचार केला जाणार आहे. त्यानंतर जो काही ठराव मंजूर होईल त्यानंतर 15 ते 30 दिवसांमध्ये प्रमाणपत्र देण्यात येईल. जर अर्ज नाकारला तरीसुद्धा तुम्ही त्यासाठी Appeal करू शकता.

अर्जाची स्थिती Step-by-Step कशी पाहायची?

01
Mahila Shetkari Website वर जा

दिलेल्या Mahila Shetkari Service Website वर जा. हवे असल्यास वेबसाइटवरील भाषा बदलून घ्या.

02
अर्जाची स्थिती Option निवडा

मराठी भाषा केली तर अर्जाची स्थिती हा Option दिसेल. आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ‘अर्जाची स्थिती’ (Track Application Status) या पर्यायावर क्लिक करा.

Status Check करण्याच्या 2 पद्धती

पद्धत 1

पोचपावती क्रमांकाने Status

पोचपावती क्रमांकाची माहिती भरून अर्जाची स्थिती वर क्लिक करा.

पद्धत 2

अर्जदाराच्या नावाने Status

दुसरी पद्धत म्हणजे अर्जदाराचे नाव टाकून सुद्धा Status Check करता येते. अर्जदाराचे नाव, जिल्हा, तालुका आणि गाव ही माहिती भरून अर्जाची स्थिती Check करता येते.

अर्जाची स्थिती Check करण्याचा Screenshot

अर्जाची स्थिती Check करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेतील screenshot. पोचपावती क्रमांक किंवा नाव वापरून Application Status Check करण्याची प्रक्रिया.

Mahila Shetkari Application Status Check Screenshot
Mahila Shetkari Certificate Application Status Screenshot
Mahila Shetkari Application Status Process Screenshot

Mahila Shetkari Application Status — Complete Process Flow

Mahila Shetkari Website
→
भाषा निवडा
→
अर्जाची स्थिती
→
पोचपावती क्रमांक
/
अर्जदाराचे नाव
→
जिल्हा
→
तालुका
→
गाव
→
Application Status
Mahila Shetkari Service Portal uat-mahakrishi.mahaitgov.in
Status Check करा →

Mahila Shetkari Certificate Download

अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतर (ठराव मंजूर झाल्यानंतर) ते Online Download Certificate हा पर्याय उपलब्ध होईल.

महत्त्वाची सूचना: प्रमाणपत्र Download करण्यासाठी तुमचा पोचपावती क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्ज Submit केल्यानंतर मिळालेला पोचपावती क्रमांक हरवू नये याची काळजी घ्या.

इथे 2 पद्धतीने प्रमाणपत्र डाउनलोड करता येते:

01
पोचपावती क्रमांकाद्वारे Certificate Download

आता तुमच्या कडे पोचपावती क्रमांकाद्वारे असेल तर त्याने तुम्ही बघू शकता. पोचपावती क्रमांक टाका आणि प्रमाणपत्र मिळवा वर क्लिक करा.

02
Aadhaar OTP द्वारे Certificate Download

अजून एक सोप्पी पद्धत म्हणजे आधार OTP द्वारे. आधार OTP द्वारे वर क्लिक करा. 12 अंकी Aadhaar Number टाका. तुमची ओळख पटवण्यासाठी तुमच्या Aadhaar-linked mobile number वर OTP पाठवला जाईल. OTP टाका आणि ओळख पटवून घ्या.

Certificate Download Portal

website वर गेल्यानंतर भाषा तुम्ही बदलू शकता, मी मराठी भाषा निवडतोय. प्रमाणपत्र डाउनलोड करा वर क्लिक करा.

Mahila Shetkari Certificate Download Portal
Mahila Shetkari Certificate Download Aadhaar OTP
आणि ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही महिला शेतकरी प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
Certificate Download Portal uat-mahakrishi.mahaitgov.in/certificate
Download Certificate →

Mahila Shetkari Certificate Process | थोडक्यात प्रक्रिया

  1. महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्रासाठी पात्रता पाहा.
  2. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
  3. ऑफलाईन पद्धतीने कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करा.
  4. किंवा ऑनलाईन पद्धतीने संबंधित पोर्टलवर अर्ज सादर करा.
  5. ग्रामसभा ठराव मंजूर करेल.
  6. प्रमाणपत्र मिळवा (Online Download).

Mahila Shetkari Pramanpatra FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Mahila Shetkari Certificate म्हणजे काय?

महिलांना शेतकरी म्हणून अधिकृतपणे प्रशासकीय ओळख मिळण्यासाठी हे प्रमाणपत्र दिले जाते.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कोण अर्ज करू शकते?

अर्जदार महिला असावी आणि ती जमीन मालक, वैध कुळ, वाटेकरी, भाडेकरू, शेत मजूर किंवा बटाईदार म्हणून शेतीमध्ये सक्रिय असलेली महिला अर्ज करू शकते, अशी माहिती दिलेली आहे. तसेच ती ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असावी.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी जमीन असणे आवश्यक आहे का? (सातबारा आवश्यक आहे का?)

दिलेल्या माहितीनुसार महिलेकडे शेती असू द्या किंवा नसू द्या, तरीसुद्धा ती महिला अर्ज करू शकते. होय, जरी सातबारा नसला आणि महिला शेतात मजुरी किंवा शेतीची कामे करत असेल, तरी ती या योजनेसाठी अर्ज करू शकते.

नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना हे प्रमाणपत्र मिळेल का?

नाही, महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रातील महिला या प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना ते मिळणार नाही.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी वय किती असावे?

दिलेल्या माहितीनुसार अर्जदार महिलेचे 18 वर्ष वय पूर्ण असणे गरजेचे आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कोणता रहिवासी पुरावा चालतो?

दिलेल्या माहितीनुसार Ration Card, Voting Card किंवा Light Bill यापैकी कोणताही एक पुरावा चालू शकतो.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी Aadhaar आवश्यक आहे का?

होय. दिलेल्या माहितीनुसार अर्जदाराकडे वैध Aadhaar Card असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये Aadhaar Number आणि Aadhaar ला Link असलेला Mobile Number वापरला जातो.

Aadhaar OTP कुठे येतो?

Aadhaar ला Link असलेल्या Mobile Number वर 6 अंकी OTP येतो.

Mahila Shetkari Pramanpatra अर्जामध्ये कोणते शेती काम निवडता येते?

पीक लागवड, बियाणे उत्पादन, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, मधमाशी पालन, दूध व्यवसाय, फळ उत्पादन, कुकुट पालन, रेशीम उद्योग, गांडूळ शेती, वनोपज संकलन, शेतमालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन अशा प्रकारचे काम निवडता येते.

Farmer ID Mandatory आहे का? कुटुंबातील सदस्याकडे Farmer ID असल्यास काय करायचे?

दिलेल्या माहितीनुसार Farmer ID Mandatory नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे Farmer ID असल्यास होय निवडून त्यांचा 11 अंकी Farmer ID टाकायचा आहे आणि शेतकरी ID सत्यापित करा या Option वर Click करायचे आहे. नसेल तर नाही पर्याय Select करून अर्ज पुढे करता येतो.

महिला शेतकरी प्रमाणपत्राचे फायदे काय आहेत?

कृषी योजनांमध्ये 30% आरक्षणाचा लाभ, अनेक कृषी योजनांमध्ये 10 ते 20% अतिरिक्त सबसिडी, बँक कर्ज व सूक्ष्म वित्त पुरवठ्यासाठी उपयोग आणि महिला बचत गट, महिला शेतकरी गट किंवा FPO संदर्भातील प्रक्रिया सोपी होते.

Mahila Shetkari Certificate Online Apply करता येते का?

होय. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पोर्टलवर, शेतकरी योजनेच्या पोर्टलवर किंवा आपले सहकार केंद्र या पोर्टलवर ‘Apply Now’ या पर्यायातून महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी Online अर्ज करता येतो.

महिला शेतकरी प्रमाणपत्र ऑफलाईन मिळू शकते का?

होय. तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुक्याचा कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करून हे प्रमाणपत्र मिळवू शकता.

अर्ज Submit केल्यानंतर काय मिळते?

अर्ज Successfully Submit झाल्यानंतर एक पोचपावती क्रमांक (Acknowledgement Number) मिळतो. हा नंबर Save करून ठेवायचा आहे. हा Application Status आणि Certificate Download करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

Mahila Shetkari Application Status कुठे आणि कसा पाहायचा?

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या वेबसाइटवर जाऊन अर्जाची स्थिती (Track Application Status) या Option वर क्लिक करून Status Check करता येतो. येथे Acknowledgement Number (पोचपावती क्रमांक) किंवा अर्जदाराचे नाव, जिल्हा, तालुका आणि गाव ही माहिती भरून अर्जाचे Status पाहता येते.

महिला शेतकरी प्रमाणपत्र किती दिवसांत मिळते?

दिलेल्या माहितीनुसार प्रमाणपत्रासाठी 15 ते 30 दिवस लागू शकतात. तसेच ठराव मंजूर झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये प्रमाणपत्र देण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे.

Mahila Shetkari Certificate Online Download करता येते का?

होय. अर्ज मंजूर झाल्यानंतर Download Certificate पर्यायातून Acknowledgement Number किंवा Aadhaar Number + OTP वापरून प्रमाणपत्र Download करता येते.

Related Search Terms
Mahila Shetkari Certificate 2026 महिला शेतकरी प्रमाणपत्र Mahila Farmer Certificate महिला शेतकरी प्रमाणपत्र फायदे Mahila Shetkari Benefits महिला शेतकरी योजना Mahila Farmer ID महिला शेतकरी अनुदान महिला शेतकरी 30% आरक्षण कृषी योजना महिला शेतकरी महिला शेतकरी सबसिडी Mahila Shetkari Certificate Documents महिला शेतकरी प्रमाणपत्र कागदपत्रे Mahila Shetkari Online Apply महिला शेतकरी प्रमाणपत्र ऑनलाइन महिला शेतकरी प्रमाणपत्र ऑफलाइन

निष्कर्ष | महिला शेतकरी असल्यास प्रमाणपत्राबाबत माहिती घ्या

तर शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो जर तुमच्याही घरात महिला शेतकरी असतील तर आजच हे प्रमाणपत्र काढून घ्या आणि शासनाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असते.

महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र Portal वर जाऊन अर्ज करा या Option मधून Online Application करता येतो. आणि या प्रमाणपत्रामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सवलती कसे मिळवता येतील आणि या विविध योजनाचा परिपूर्ण लाभ घ्या.

Online अर्ज करा →
WhatsApp Group नवीन अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवा
Join Now

⚠️ अस्वीकरण (Disclaimer)

Sheti Shala (Proranker.in) हे एक स्वतंत्र आणि खाजगी शैक्षणिक ब्लॉग आहे. याचा कोणत्याही सरकारी विभागाशी, महाडीबीटी (MahaDBT) किंवा CSC पोर्टलशी अधिकृत संबंध नाही. आम्ही दिलेली सर्व माहिती अधिकृत GR आणि वृत्तपत्रांच्या आधारे वाचकांच्या सोयीसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी कृपया संबंधित योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर माहितीची खात्री करा.

संबंधित विषय (Tags):

Pravin - ProRanker Author

Pravin

महाराष्ट्र कृषी व CSC डिजिटल सेवा मार्गदर्शक

लेखक

ProRanker.in आणि Sheti Shala वर शासकीय योजना, कृषी सेवा, Farmer ID, MahaDBT, 7/12 आणि डिजिटल सरकारी सेवांची माहिती सोप्या भाषेत मांडतात. Digital content creation मध्ये 5+ वर्षांचा अनुभव.

कृषी शासकीय योजना Farmer ID MahaDBT CSC सेवा
✓

या लेखातील माहिती संबंधित अधिकृत स्रोतांच्या आधारे तपासून आणि वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली जाते.

आमच्या शेतकरी कुटुंबात सामील व्हा! 🌾

सरकारी योजना, पीक विमा, आणि कृषी विषयक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. हा लेख इतर बांधवांना शेअर करायला विसरू नका.

याच कॅटेगरीमधील महत्त्वाचे लेख

One response to “Mahila Shetkari Praman Patra : 2026: Online अर्ज, पात्रता, कागदपत्रे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *