E Thibak pahani 2026 – 1 जुलैपासून Online सर्वे

Posted on May 27, 2026

शासनाने ई-पीक पाहणी प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. आता DCS ई-पीक पाहणी app द्वारे पाहणी केली जाणार आहे. 1 जुलै 2026 नंतर ही प्रक्रिया राज्यभर लागू होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून ई-पीक पाहणी app बद्दल बऱ्याच अडचणी होत्या त्या सगळ्या आता सुधारावल्या जातील आणि अधिक पारदर्शक पद्धतीने डिजिटल स्वरूपात पीक पाहणी पार पडली जाईल .

DCS E-Pik pahani App (DCS ई-पीक पाहणी काय आहे ?)

DCS म्हणजे Digital Crop Survey. हे केंद्र शासनाने विकसित केलेले app आहे. शेतात जाऊन पीकाचा फोटो, जिओ टॅगिंग, लागवड क्षेत्र, मिश्रपीक माहिती आणि इतर माहिती ह्या app मध्ये नोंदवली जाणार आहे.

ह्या App ची विशेषतः म्हंजे ज्या भागात नेटवर्क नाही, त्या ठिकाणीही माहिती भरता येणार आहे. फोटो आणि माहिती सेव्ह करून नंतर नेटवर्क आल्यानंतर ती अपलोड करता येईल.

केंद्र शासनाने 100 टक्के ई-पीक पाहणी बंधनकारक केली

मागील वर्षांत राज्यात केवळ 60 ते 70 टक्केच ई-पीक पाहणी पूर्ण झाली होती. मात्र आता केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी 100 टक्के ई-पीक पाहणी सक्तीची केली आहे.

शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार?

नवीन App मधून अचूक माहिती भरली जाईल त्या मुळे शेतकऱ्यांना पुढील योजनांमध्ये होऊ शकतो.

DCS MH App Download 

Download


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact