शेतकरी कर्जमाफी 2026: कर्जमुक्ती योजनेचे 3 महत्त्वाचे भाग समजून घ्या

Posted on June 10, 2026

शेतकरी कर्जमाफीचा नवीन GR आलेले आहे आणि त्यानुसार 3 महत्वाच्या अटी सुद्धा आहेत , तर काय आहेत त्या अटी आणि कुना कुणाला होणार कर्ज माफी हे आपण सविस्तर बघुत.

2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाचा विचार केला जाणार आहे.

शेतकऱ्याचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असेल तर तो पात्र ठरू शकतो.

मुद्दल आणि व्याज मिळून एकूण थकबाकी 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास ती रक्कम माफ केली जाऊ शकते.

2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी OTS

2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट (OTS) ची तरतूद आहे.

ही रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचा लाभ

2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ दिला जाऊ शकतो.


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact