Farmer ID Verification Pending – फार्मर ID verification करा
Posted on August 12, 2026

Table of Contents
शेतकऱ्यांना सध्या Farmer ID संदर्भात वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. काही ठिकाणी Farmer ID अप्रूव्ह असूनही मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी व्हेरिफाय झालेला नसल्यामुळे समस्या येत आहे . तर आपण या समस्या कशा solve करायच्या ते बघू.
- Farmer ID Verify करण्यासाठी काय करायचे?
- सर्वप्रथम Farmer ID चे पोर्टल वर जाऊन Farmer Login करायचं आहे . official link खाली दिली आहे.
- Create New User Account मध्ये आधार नंबर टाकल्यानंतर Verification Pending असा स्टेटस दिसू शकतो.
मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफाय केल्यानंतर शेतकऱ्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
- आधार व्हेरिफाईड स्टेटस
- शेतकऱ्याचे नाव
- वय
- जन्मतारीख
- गावाचा पत्ता
Farmer ID ला मोबाईल नंबर लिंक करा
- यानंतर Provide Mobile Number Linked to AgriStack Platform असा पर्याय दिसेल.
- येथे Farmer ID साठी वापरायचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या नंबरवर OTP पाठवला जाईल.
- आलेला OTP टाकून Verify करायचे आहे.
- मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर पासवर्ड सेट करायचा आहे आणि Create My Account वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर अकाउंट तयार झाल्याची सूचना दिसते.
Farmer ID मध्ये पुन्हा लॉगिन करा
- मोबाईल नंबर टाका.
- सेट केलेला पासवर्ड टाका.
- कॅप्चा कोड भरा.
- Login वर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाका.
- पुन्हा Login करा.
लॉगिन केल्यानंतर Enrollment Status Approved असल्याचे दिसते. तसेच My Information मध्ये जमिनीची माहिती आणि इतर माहितीही पाहायला मिळते.




