Dushkal Panchnama Form 2026: दुष्काळ सर्वे व पीक नुकसान भरपाई संयुक्त पंचनामा फॉर्म
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती व गावांमध्ये दुष्काळाचे सर्वे व प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाले आहेत. शेतकरी बांधवांकडून भरून घेतला जाणारा संयुक्त पंचनामा फॉर्म, आवश्यक कागदपत्रे आणि शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे, याची संपूर्ण माहिती मराठीत जाणून घ्या.
Dushkal Survey Process: दुष्काळ सर्वे व पंचनामा फॉर्म कसा भरला जातो?
शेतकरी मित्रांनो, सध्या सर्व गावांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळाचे सर्वे सुरू झाले आहेत. यामध्ये ग्रामस्तरीय संयुक्त पंचनामा समितीचे सदस्य आणि पंच स्वतः शेतात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करतात आणि हा फॉर्म भरतात.
प्राथमिक माहिती व गावाची नोंद
फॉर्मच्या सुरुवातीला गाव, तालुका, जिल्हा, दिनांक आणि विषय-संदर्भ नोंदवला जातो. त्यानंतर ‘ग्रामस्तरीय संयुक्त पंचनामा समितीचे सदस्य व पंच आज रोजी मौजे [गावचे नाव] येथील शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली’ अशी नोंद केली जाती.
खाते नंबर, गट नंबर व नुकसान क्षेत्र
तक्त्यामध्ये खालील महत्त्वाचे तपशील भरले जातात:
- खाते नंबर व क्षेत्र: शेतकर्याचा 8-अ व एकूण शेतजमीन क्षेत्र.
- गट नंबर व पीक: जमिनीचा सर्वे/गट नंबर आणि बाधित झालेल्या पिकाचे नाव.
- बाधित क्षेत्र व टक्केवारी: बाधित क्षेत्र (एकर/गुंठे) आणि पिकाच्या नुकसानाची टक्केवारी (33% पेक्षा कमी किंवा 33% पेक्षा जास्त नुकसान).
Dushkal Panchnama Required Documents: पंचनाम्यावेळी कोणती कागदपत्रे द्यावी लागतात?
पंच जेव्हा प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येतात, तेव्हा शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत किंवा पंचायतीकडे सादर करावी लागतात:
आवश्यक कागदपत्रांची यादी
- पिकाचे जिओ-टॅगिंग फोटो (जे अधिकारी स्वतः ॲपमधून काढतात).
- सातबारा (7/12) आणि आठ-अ (8A) उतारा.
- आधार कार्डची झेरॉक्स.
- फार्मर आयडी (Farmer Registry ID) तपशील किंवा क्रमांक.
- बँक पासबुकची झेरॉक्स (खाते नंबर व IFSC कोडसाठी).
- संमती पत्र: जमीन सामायिक (Joint Family/Shared) असल्यास इतर वारसदारांचे संमती पत्र.

Dushkal Panchnama Form PDF: अधिकृत पंचनामा फॉर्म डाऊनलोड करा
अभ्यासासाठी किंवा माहितीसाठी तुम्ही खालील अधिकृत दुष्काळ संयुक्त पंचनामा फॉर्म डाऊनलोड करू शकता:
Dushkal Survey FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
दुष्काळाचा पंचनामा फॉर्म शेतकऱ्याने स्वतः भरायचा असतो का?
नाही, ग्रामस्तरीय संयुक्त पंचनामा समितीचे सदस्य आणि पंच प्रत्यक्ष शेतात येऊन हा फॉर्म स्वतः भरतात आणि पडताळणी करून शेतकऱ्याची सही घेतात.
पंचनाम्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
सातबारा, 8-अ, आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी आणि जमीन सामायिक असल्यास संमती पत्र द्यावे लागते.
नुकसानाची किती टक्केवारी असणे गरजेचे आहे?
पिकाचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरतो.
दुष्काळ पंचनामा फॉर्म कसा डाऊनलोड करावा?
वरील लिंकवरून तुम्ही ‘Dushkal Panchnama Form PDF’ मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करू शकता.



Leave a Reply