265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर | Drought Declared 2026
राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६ साठी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती लागू केल्या आहेत.
दुष्काळ सदृश्य असलेल्या 265 तालुक्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. मध्यम आणि गंभीर स्वरूपाचा दुष्काळ (Trigger-1) या प्रकारानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये अखेर हा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळाच्या सवलती या तालुक्यांसाठी लागू करण्यात आलेल्या आहेत.
खाली आम्ही 26 सप्टेंबर 2026 च्या शासन निर्णयाची (GR) सविस्तर माहिती आणि या सवलतींचा प्रत्यक्षात लाभ कसा घ्यावा.
अधिकृत शासन निर्णय (GR) येथे पहा ↗Drought Relief Maharashtra 2026 | दुष्काळाच्या सवलती
शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी खालील सवलती आणि उपाययोजनांचा समावेश केलेला आहे:
- जमीन महसूलात ३३% टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्यास सूट
- शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्घटन (Restructuring of crop loans)
- शेतीशी निगडित पीक कर्जाच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती
- साडे ५ HP च्या वरील कृषी वीज पंपांच्या बिलामध्ये सवलत
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात संपूर्ण माफी
- रोजगार हमी योजनेची (MGNREGA) कामे तातडीने सुरू करणे
- पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन व छावण्या सुरू करणे
- शेती पंप वीज जोडणी खंडित न करणे
सवलतींची घोषणा झाली असली तरी लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा:
२. परीक्षा शुल्क माफी: विद्यार्थ्याने किंवा पालकाने शाळेच्या/महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे आपला गाव दुष्काळग्रस्त यादीत असल्याचा पुरावा (७/१२) जोडून अर्ज द्यावा.
३. जमीन महसूल सूट: तलाठी कार्यालयात संपर्क साधा. शासन निर्णयानंतर तलाठी स्तरावर गावनिहाय याद्या तयार केल्या जातात.
Crop Loss Assistance 2026 | पीक नुकसान मदतीबाबत स्वतंत्र GR
सध्या जाहीर झालेला GR हा केवळ ‘दुष्काळी सवलती’ लागू करण्यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट नुकसान भरपाईची (NDRF/SDRF निकषानुसार) रक्कम जमा करण्याबाबतची माहिती यात नाही.
पीक नुकसानीबाबतची आर्थिक मदत आणि त्याची पूर्ण अहवाल आकडेवारी आल्यानंतर निधी वाटपासाठी स्वतंत्र GR निर्गमित केला जाणार आहे.
Maharashtra Drought 2026 | जिल्हानिहाय तालुक्यांची यादी
कोणत्या तालुक्यांचा या २६५ च्या यादीत समावेश आहे ते खालीलप्रमाणे:
ठाणे जिल्हा
ठाणे जिल्ह्यातील एकही तालुका नाही.
पालघर जिल्हा
पालघर मधील एकही तालुका नाही.
रायगड जिल्हा
- श्रीवर्धन
रत्नागिरी जिल्हा
- रत्नागिरी
- लांजा
- संगमेश्वर
- राजापूर
सिंधुदुर्ग जिल्हा
- सावंतवाडी
- दोडामार्ग
- कणकवली
- कुडाळ
- वैभववाडी
- मालवण
- देवगड
- वेंगुर्ला
नाशिक जिल्हा
- मालेगाव
- बागलाण
- कळवण
- नांदगाव
- सुरगणा
- इगतपुरी
- पेठ
- सिन्नर
- येवला
- देवळा
धुळे जिल्हा
- धुळे
- साक्री
- सिंदखेडा
- शिरपूर
जळगाव जिल्हा
- एरंडोल
- पारोळा
- धरणगाव
- चोपडा
- पाचोरा
- जामनेर
- जळगाव
- भडगाव
- अमळनेर
- रावेर
- चाळीसगाव
- भुसावळ
- बोदवड
- मुक्ताईनगर
- यावल
नंदुरबार जिल्हा
- अक्कलकुवा
- शहादा
- नंदुरबार
- नवापूर
- तळोदा
- अक्राणी
अहिल्यानगर जिल्हा
- अहिल्यानगर
- पारनेर
- श्रीगोंदा
- कर्जत
- जामखेड
- शेवगाव
- पाथर्डी
- नेवासा
- राहुरी
- संगमनेर
- अकोले
- कोपरगाव
- श्रीरामपूर
- राहता
पुणे जिल्हा
- भोर
- वेल्हा
- खेड
- शिरूर
- बारामती
- इंदापूर
- दौंड
- पुरंदर
सोलापूर जिल्हा
- उत्तर सोलापूर
- दक्षिण सोलापूर
- बार्शी
- अक्कलकोट
- मोहोळ
- माढा
- करमाळा
- पंढरपूर
- सांगोला
- माळशिरस
- मंगळवेढा
सांगली जिल्हा
- मिरज
- आटपाडी
- जत
- कवठे महांकाळ
सातारा जिल्हा
- सातारा
- खटाव
- माण
- फलटण
- खंडाळा
- महाबळेश्वर
कोल्हापूर जिल्हा
- पन्हाळा
- राधानगरी
- गगनबावडा
- भुदरगड
- आजरा
- चंदगड
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
- छत्रपती संभाजीनगर
- कन्नड
- सोयगाव
- पैठण
- वैजापूर
- गंगापूर
- खुलताबाद
- सिल्लोड
- फुलंब्री
जालना जिल्हा
- बदनापूर
- घनसावंगी
- अंबड
- जालना
- परतूर
- मंठा
- भोकरदन
- जाफराबाद
बीड जिल्हा
- बीड
- गेवराई
- माजलगाव
- केज
- आंबेजोगाई
- परळी
- आष्टी
- पाटोदा
- शिरूर कासार
- धारूर
- वडवणी
लातूर जिल्हा
- लातूर
- औसा
- अहमदपूर
- निलंगा
- उदगीर
- चाकूर
- रेणापूर
- शिराळा (आनंदपाळ)
- देवणी
- जळकोट
धाराशिव जिल्हा
- धाराशिव
- कळंब
- भूम
- वाशी
- तुळजापूर
- लोहारा
- परंडा
- उमरगा
नांदेड जिल्हा
- नांदेड
- बिलोली
- कंधार
- लोहा
- हदगाव
- भोकर
- देगलूर
- किनवट
- हिमायतनगर
- माहूर
- धर्माबाद
- उमरी
- अर्धापूर
- नायगाव
परभणी जिल्हा
- पूर्णा
- सेलू
- परभणी
- सोनपेठ
- जिंतूर
- गंगाखेड
- पाथरी
- मानवत
- पालम
हिंगोली जिल्हा
- हिंगोली
- औंढा नागनाथ
- कळमनुरी
- सेनगाव
- वसमत
बुलढाणा जिल्हा
- जळगाव जामोद
- संग्रामपूर
- चिखली
- देऊळगाव राजा
- मेहकर
- बुलढाणा
- सिंदखेड राजा
- लोणार
- खामगाव
- शेगाव
- मलकापूर
- मोताळा
- नांदुरा
अमरावती जिल्हा
अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
अकोला जिल्हा
- अकोट
- अकोला
- पातूर
- तेल्हारा
- मूर्तिजापूर
- बाळापूर
- बार्शी टाकळी
वाशिम जिल्हा
- वाशिम
- रिसोड
- मालेगाव
- मंगरूळपीर
- कारंजा
- मानोरा
यवतमाळ जिल्हा
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
वर्धा जिल्हा
- वर्धा
- सेलू
- देवळी
- आर्वी
- समुद्रपूर
- हिंगणघाट
- आष्टी
- कारंजा घाडगे
नागपूर जिल्हा
- नागपूर
- कामठी
- सावनेर
- पारशिवनी
- मौदा
- भिवापूर
- कळमेश्वर
- काटोल
- रामटेक
- हिंगणा
- उमरेड
- कुही
- नरखेड
भंडारा जिल्हा
- भंडारा
- पवनी
- लाखांदूर
गोंदिया जिल्हा
- तिरोडा
चंद्रपूर जिल्हा
- चंद्रपूर
- भद्रावती
- गोंडपिंपरी
- राजुरा
- कोरपना
- मूल
- वरोरा
- सावली
- चिमूर
- नागभीड
- सिंदेवाही
- पोंभुर्णा
गडचिरोली जिल्हा
- गडचिरोली
- चामोर्शी
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी मिळवण्यासाठी काय करावे?
शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडे तुम्ही दुष्काळग्रस्त गावातील रहिवासी असल्याचा पुरावा (७/१२ उतारा किंवा रहिवासी दाखला) जोडून लेखी अर्ज देणे आवश्यक असते.
पीक कर्जाचे पुनर्घटन करण्यासाठी बँकेत कोणती कागदपत्रे लागतील?
तुम्हाला बँक पासबुक, आधार कार्ड, आणि चालू वर्षाचा नवीन ७/१२ व ८-अ उतारा घेऊन संबंधित बँक शाखेत संपर्क साधावा लागेल व पुनर्घटनासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.
वीज बिलातील सवलत कशी मिळेल?
महावितरण (MSEB) कडून दुष्काळग्रस्त यादीतील गावांना सिस्टीममधून आपोआप सवलत लागू केली जाते. मात्र तुमच्या बिलात सवलत न आल्यास, जवळच्या वीज वितरण कार्यालयात या GR ची प्रत दाखवून संपर्क साधावा.
पुढील प्रक्रिया आणि अपडेट्स
२६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी सवलती लागू झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयातून आपले लाभ मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
थेट आर्थिक मदतीचा (नुकसान भरपाई) दुसरा GR आल्यावर त्याची सविस्तर माहिती आणि यादी आमच्या ‘सरकारी योजना’ या विभागात त्वरित अपडेट केली जाईल.



Leave a Reply