शेती शाळा • महाराष्ट्र कृषी योजना, पीक सल्ला व CSC सेवा पोर्टल
शेती शाळा
SHETI SHALA
शेती शाळा • कृषी व योजना पोर्टल
शेतकरी योजना
⏱️ 8 मिनिटे वाचन वाचण्याचा वेळ

मागेल त्याला सौर कृषी पंप 2026:अर्ज, कागदपत्रे : Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra

Pravin
प्रमाणित कृषी व CSC मार्गदर्शक
📅 प्रकाशित: 30 September 2026
🔄 अपडेट: 17 October 2026
Mahavitran MTSKPY Portal • Solar Pump Online Application

Solar Pump Scheme Online Apply 2026: महावितरण सोलर पंप योजना अर्ज कसा करावा?

महावितरण सोलार पंप योजना (MTSKPY) अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा? भाषा निवडण्यापासून ते कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करून अर्ज फायनल सबमिट करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया मराठीत सोप्या भाषेत जाणून घ्या.

Solar Pump Scheme Online Apply: पोर्टलवर अर्ज कसा सुरू करावा?

महावितरण सोलार पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. अर्ज भरण्याची सविस्तर सुरुवात खालीलप्रमाणे आहे:

Mahavitran Solar Pump Portal https://portal.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
पोर्टल उघडा →
Solar Pump Portal Screenshot 1
01

भाषा निवड व बेनिफिशरी सर्विस

बेनिफिशरी सर्विस मध्ये ‘अप्लाय’ या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपली भाषा निवडून घ्या (उदा. मराठी).

02

सिंचन प्रणाली व ठिकाण निवड

त्यानंतर उपसा सिंचन प्रणाली आहे का? असल्यास ‘येस’ निवडा. मग तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून घ्या. त्यानंतर मुख्य संरक्षण किंवा मुख्य गट क्रमांक टाईप करून घ्या आणि उपगट क्रमांक तिथे सिलेक्ट करा.

03

जमीन व अर्जदाराची माहिती

शेतीचा प्रकार सेल्फ (Self) निवडा. जमीन मालकाच्या नावावर क्लिक केल्यावर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ एकरमध्ये दाखवले जाईल. त्यानंतर अर्जदाराचे नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव, आडनाव, लिंग आणि जात निवडून घ्या.

04

रहिवासी तपशील व मोबाईल ओटीपी प्रमाणीकरण

अर्जदाराचा रहिवासी तपशील जसे की घर क्रमांक, रस्ता, खून जे काय असेल ते टाका. जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड नंबर टाईप करा. त्यानंतर ‘I Agree’ वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाईप करा आणि ‘Send OTP’ या बटनवर क्लिक करा.

मोबाईलवर आलेला ओटीपी कोड टाकून तो व्हेरिफाय करून घ्या आणि ओके दाबा.

Water Source & Pump Details: जलस्रोत आणि पंपाची माहिती भरणे

ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला जलस्रोत, सिंचन आणि आवश्यक पंपाचा तपशील भरावा लागेल.

01

जलस्रोत आणि सिंचन माहिती

जलस्रोत प्रकल्प प्रकारामध्ये ‘वेल/विहीर’ निवडा. सिंचन प्रकार ‘ओपन’, पाण्याची गुणवत्ता ‘सॉफ्ट’ आणि जलस्रोताची खोली फूटामध्ये निवडा (तुमच्या जमिनीनुसार योग्य पर्याय टाका). विद्यमान शेतात तलाव आहे का? असेल तर ‘येस’ करा, नसेल तर ‘नो’ करा.

Solar Pump Water Source Screenshot 2
02

कृषी तपशील व पिकांची माहिती

मागील वर्षाची पिकाचा प्रकार आणि पिकाची संख्या टाईप करून घ्या.

03

आवश्यक पंप तपशील (Pump Details)

विद्यमान पंप तपशील ‘नो’ करा. त्यानंतर आवश्यक पंप प्रकारामध्ये ‘डीसी’ (DC) निवडा, आवश्यक उपप्रकारामध्ये ‘सबमर्सिबल’ (Submersible) निवडा. आवश्यक पंप श्रेणीमध्ये वॉटर आणि एचपी (HP) तुमच्या जमिनीनुसार योग्य ते निवडा. बुस्टर पंप आणि मोनोपोल तपशील आवश्यक असेल तर निवडा, अन्यथा ‘नो’ करा.

Bank Details & Document Upload: बँक तपशील व कागदपत्रे अपलोड करणे

अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी बँक खात्याची अचूक माहिती देणे व कागदपत्रे पीडीएफ (PDF) स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.

01

बँक तपशील भरणे

सर्वप्रथम बँक खाते नंबर टाईप करा, खातेधारकाचे नाव टाका आणि त्यानंतर आयएफसी (IFSC) कोड टाका. ‘बँक तपशील शोध’ यावर क्लिक केल्यावर बँकेचे नाव ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर MICR कोड, शाखेचे नाव, शहर आणि गावाचे नाव टाईप करून घ्या.

Solar Pump Document Upload Screenshot 3
02

घोषणापत्र व कागदपत्रे अपलोड

घोषणापत्र पूर्ण वाचून घ्या आणि टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक करा. त्यानंतर खालील कागदपत्रे पीडीएफ (PDF) फाईलमध्ये अपलोड करावी लागतील:

  • सर्वप्रथम सातबारा (7/12) अपलोड करून घ्या.
  • त्यानंतर बँक पासबुक पीडीएफमध्ये अपलोड करा.
  • त्यानंतर पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (Photo) पीडीएफ किंवा योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
03

अर्ज जतन करणे व सबमिट करणे

‘अपलोड’ या बटनावर दाबून ‘जतन आणि पुढे’ वर क्लिक करा. एकदा भरलेली सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर खालील ‘जतन आणि पुढे’ वर क्लिक करून ओके दाबा. प्रक्रिया सुरू असताना रिफ्रेश वगैरे दाबू नका. अशाप्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या भरला जाईल!

Solar Pump Scheme FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महावितरण सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

महावितरणच्या अधिकृत सोलर पोर्टलवर (MTSKPY) जाऊन बेनिफिशरी सर्विसमधून अर्ज करता येतो. यामध्ये वैयक्तिक माहिती, जमीन तपशील, पंप प्रकार आणि बँक माहिती भरावी लागते.

अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात?

अर्ज करताना सातबारा (7/12), बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र हे कागदपत्रे प्रामुख्याने पीडीएफ (PDF) स्वरूपात अपलोड करावी लागतात.

सोलर पंप अर्जासाठी कोणता पंप प्रकार निवडावा?

आवश्यक पंप तपशीलामध्ये पंप प्रकार म्हणून ‘DC’ आणि उपप्रकार म्हणून ‘Submersible’ (सबमर्सिबल) निवडावे लागते, तसेच जमिनीनुसार एचपी (HP) निवडावी.

फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी?

फॉर्म भरल्यानंतर ‘जतन आणि पुढे’ दाबून ओके केल्यावर पेज रिफ्रेश करू नये, जेणेकरून अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल.

WhatsApp Group नवीन अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवा
Join Now

⚠️ अस्वीकरण (Disclaimer)

Sheti Shala (Proranker.in) हे एक स्वतंत्र आणि खाजगी शैक्षणिक ब्लॉग आहे. याचा कोणत्याही सरकारी विभागाशी, महाडीबीटी (MahaDBT) किंवा CSC पोर्टलशी अधिकृत संबंध नाही. आम्ही दिलेली सर्व माहिती अधिकृत GR आणि वृत्तपत्रांच्या आधारे वाचकांच्या सोयीसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी कृपया संबंधित योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर माहितीची खात्री करा.

संबंधित विषय (Tags):

Pravin - ProRanker Author

Pravin

महाराष्ट्र कृषी व CSC डिजिटल सेवा मार्गदर्शक

लेखक

ProRanker.in आणि Sheti Shala वर शासकीय योजना, कृषी सेवा, Farmer ID, MahaDBT, 7/12 आणि डिजिटल सरकारी सेवांची माहिती सोप्या भाषेत मांडतात. Digital content creation मध्ये 5+ वर्षांचा अनुभव.

कृषी शासकीय योजना Farmer ID MahaDBT CSC सेवा
✓

या लेखातील माहिती संबंधित अधिकृत स्रोतांच्या आधारे तपासून आणि वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली जाते.

आमच्या शेतकरी कुटुंबात सामील व्हा! 🌾

सरकारी योजना, पीक विमा, आणि कृषी विषयक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. हा लेख इतर बांधवांना शेअर करायला विसरू नका.

याच कॅटेगरीमधील महत्त्वाचे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *