शेतजमिनीवरून सतत वाद होत राहतात आणि यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या साठी सरकारने e mojani 2.0 चालू केलं आहे. यातून जमिनीच्या मोजणीसाठी Online अर्ज करता येतो.
भूमी अभिलेख विभागाच्या नव्या पोर्टलद्वारे शेतकरी घरबसल्या मोजणीसाठी अर्ज करू शकतात. E mojani 2.0 नेमकं आहे काय हे जाणून घेऊ.
e mojani 2.0 काय आहे?
e mojani 2.0 ही भूमी अभिलेख विभागाची ऑनलाईन सेवा आहे.
- हद्द कायम मोजणी
- पोटहिस्सा मोजणी
- बिगर शेती मोजणी
अशा विविध प्रकारच्या मोजणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येतो.चला आता जाणून घेऊन अर्ज कसा करायचा आणि अर्जसाठी काय काय पाहिजे.
e mojani 2.0 ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
सर्वात आधी तुम्हाला https://emojni2.mahabhumi.gov.in/ भूमी अभिलेख च्या website वर जायचं आहे.
त्यानंतर :
- लॉगिन करून “नवीन मोजणी” निवडा
- विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
- सर्वे/गट क्रमांक टाका
- मोजणीचा प्रकार निवडा
- अर्जदार आणि सहधारकांची माहिती भरा
- लगतधारकांची माहिती द्या
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- शुल्क भरून अर्ज सबमिट करा

e mojani 2.0 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
- आधार कार्ड / ओळखपत्र
- 3 महिन्यांतील सातबारा
- लगतधारकांचे सातबारे
- टिपण / फाळणी नकाशा
- जुने मोजणी नकाशे (लागू असल्यास)
मोजणी Fees ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरता येते. अशा वेळेस online fees भरून काम सोपं करता येते.

