Shetkari Karjmafi yadi 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या तिसऱ्या यादीत आपले नाव आहे का, याबाबत अनेक शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. विशेषतः दुसऱ्या यादीमध्ये नाव न आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. आणि आता ह्या कर्ज माफीची तिसरी यादी जाहीर झाली आहे आणि त्यात 3,51,192 शेतकरी पात्र झाले आहेत. तर नवीन यादीत नेमके कोणते जिल्हे आहेत आणि शेतकरी यादीत अपलाल नाव कस बघू शकता हे आपण बघू .
शेतकरी कर्ज माफी 2026 : 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा
Phase-wise Progress
टप्प्यानुसार प्रगती
| Phase / टप्पा | Release Date / दिनांक | Farmers / शेतकरी |
|---|---|---|
| Phase 1पहिली यादी | Jul–Aug 2026 | 16,96,000 |
| Phase 2दुसरी यादी | September 2026 | 4,20,000 |
| Phase 3तिसरी यादी | 12 October 2026 | 3,51,192 |
| Totalएकूण | Cumulativeएकत्रित | 24,67,192 |
Phase 3 — Division-wise Eligibility
टप्पा ३ — विभागनिहाय शेतकरी पात्रता
Total: 3,51,192 farmers / एकूण: ३,५१,१९२ शेतकरी
शेतकरी कर्जमाफी यादी 2026 मध्ये आपले नाव कसे तपासायचे?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यादीबाबत माहिती मिळवण्यासाठी शेतकरी खालील पर्यायांचा वापर करावा लागणार आहे कारण हि यादी सध्यातरी तुम्हाला कोणत्याच portal वर नाही भेटणार , तर मंग नेमकं यादी कुठे मिळेल हे आपण बघू.
1. आपल्या पीक कर्जाच्या बँक शाखेत चौकशी करा
आपण ज्या बँकेतून पीक कर्ज घेतले आहे, त्या बँकेच्या शाखेत संपर्क साधा. आपल्या कर्ज खात्याची स्थिती, योजनेतील पात्रता आणि कर्जमाफीसंदर्भातील उपलब्ध माहिती विचारा.
2. विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत संपर्क साधा
आपण सहकारी संस्थेमार्फत पीक कर्ज घेतले असल्यास आपल्या गावातील संबंधित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत चौकशी करा तिथे यादी लागलेली असेल . आपल्या कर्ज खात्याशी संबंधित नोंदी आणि पुढील प्रक्रियेबाबत माहिती मिळवता येईल.
3. संबंधित सहकारी कार्यालयात माहिती घ्या
आपल्या परिसरातील संबंधित सहकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची सद्यस्थिती जाणून घ्या. तिसरी यादी अधिकृतपणे प्रसिद्ध झाली आहे.
4. CSC केंद्र मध्ये माहिती तपास
यादी CSC केंद्र सुद्धा लावलेली राहील . शेतकरी स्वतः CSC केंद्र मध्ये जाऊन चौकशी करू शकता .
5. ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावलेली
ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावलेली असेल तिथे जाऊन सुद्धा शेतकरी आपले नाव यादीत शोधू शकता. आणि पुढील प्रक्रिया करू शकता.
नोट: सध्या शेतकरी कर्ज माफी यादी कोणत्याच पोर्टल वर आली नाही त्यामुळे कोणत्या पण unofficial लिंक्स वर बघणे टाळा.



Leave a Reply