संजय गांधी निराधार योजना हयाती प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रमाणपत्राद्वारे लाभार्थी जिवंत असल्याची व पेन्शनसाठी पात्र असल्याची खात्री शासनाला दिली जाते. आणि यामुळे योजनेचा लाभ घेता येतो.
आता तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या मदतीने Beneficiary Verification App वापरून हयाती प्रमाणपत्र तयार करू शकता.
ऑनलाइन हयाती प्रमाणपत्र कसे काढायचे, कोणत्या योजना यात समाविष्ट आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.
हयाती प्रमाणपत्र म्हणजे काय?
हयाती प्रमाणपत्र म्हणजे पेन्शनधारक व्यक्ती जिवंत आहे याचे प्रमाण पत्र.
महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांमध्ये पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करणे अनिवार्य असते.
कोण कोणत्या योजनांसाठी हयाती प्रमाणपत्र आवश्यक आहे?
- संजय गांधी निराधार योजना
- श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना
- अपंग पेन्शन योजना
- ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना
- सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना
ऑनलाइन हयाती प्रमाणपत्र कशे काढावे ?
बेनेफिसिअरचे Verification App वापरून तुम्ही ऑनलाइन हयाती प्रमाणपत्र तयार करू शकता. आणि हे App महाराष्ट्र शासनासच official app आहे .
- सर्वप्रथम मोबाईलच्या Play Store वर जाऊन Beneficiary Verification App डाउनलोड व इंस्टॉल करा.
- अॅप उघडल्यानंतर भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल. सोप्या वापरासाठी English भाषा निवडा.
- “Proceed for Device Registration” वर क्लिक करा
- आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका
- मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
आता तुम्हाला फेस बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागेल त्यासाठी खालील steps
- आधारवरील नाव टाका
- “Self and Family” पर्याय निवडा
- अटी मान्य करा
- कॅमेऱ्यासमोर चेहरा ठेवा आणि डोळे मिचकावून फेस स्कॅन पूर्ण करा
हे करून झाल्यानंतर Homepage वर या Maharashtra पर्याय निवडा. त्यानंतर योजना निवड आणि लाभार्थी माहिती भरा.
- “Social Security Pension” वर क्लिक करा
- “Beneficiary Verification” निवडा
- पेन्शनधारकाचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर भरा
- OTP टाकून पडताळणी पूर्ण करा
हयाती प्रमाणपत्र Download करा
हे सगळे करून झाल्यानंतर तुमच्या समोर हायती प्रमाणपत्र येते ते डाउनलोड करून घ्या .

