कृषी विभागाने ऑनलाइन खत बुकिंगची नवीन प्रणाली तयार केली आहे. यातून शेतकरी मोबाईलवरून खतांचे ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
सध्या हि सुविधा फक्त छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
Fertilizer Booking App – खत बुकिंग साठी online अँप
- शेतकऱ्यांना Google Play Store मधून Framework for Fertilizer Sale हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.
- ॲप ओपन केल्यानंतर लॉगिन करताना महाराष्ट्र राज्य निवडावे लागेल.
- शेतकरी आधार कार्ड किंवा Farmer ID च्या मदतीने लॉगिन करू शकतात.
- Farmer ID शी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येतो.
Online खत बुकिंग कस करायचं
- App login झाल्यांनतर खालील प्रक्रिया करा
- Select Crop पर्यायावर क्लिक करून पिकाची निवड करावी.
- पिकाच्या प्रकारानुसार संबंधित पीक निवडावे.
- पिकाची माहिती भरल्यानंतर जमिनीच्या क्षेत्रानुसार उपलब्ध होणाऱ्या खतांची माहिती स्क्रीनवर दिसते.
- यामध्ये युरिया, NPK, DAP, SSP आणि MOP या खतांची माहिती दाखवली जाते. शेतकऱ्याने आवश्यक ते खत निवडावे .
- खत बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक QR कोड तयार होतो. या QR कोडच्या मदतीने शेतकरी तीन दिवसांच्या आत खतांची डिलिव्हरी घेऊ शकतात.

