राज्यातील शेतकऱ्यांना आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कडधान्य पिकांच्या बियाण्यांवर अनुदान मिळणार आहे. तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेतकरी घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतात.
MAHADBT पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खाली दिली आहे .
कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान?
- तूर
- मूग
- उडीद
- इतर कडधान्य पिके
- भरडधान्य पिके
- पौष्टिक तृणधान्य पिके
- तेलबिया पिके
Farmer ID सध्या शेतीसाठी आधार कार्ड झाला आहे म्हणून सर्व शेतकर्यांकड़े हे कार्ड असणं आवश्यक आहे. आणि Farmer ID शी लिंक मोबाईल नंबर वर OTP येईल, तर तो मोबाइलला जवळ ठेवा आणि खालील steps करा .
सर्वात आधी:
MahaDBT Farmer Login ह्या वेब्सितेवर जा.
- Farmer ID टाका
- “OTP पाठवा” वर क्लिक करा
- मोबाईलवर आलेला OTP टाका
- “OTP तपासा” वर क्लिक करा
- लॉगिन झाल्यानंतर:“घटकासाठी अर्ज करा” वर क्लिक करा
- “बाबी निवडा” मध्ये:“बियाणे वितरण प्रात्यक्षिक / फ्लेक्सी घटक / औषध खत” हा पर्याय निवडा.
- हंगाम: खरीप निवड
- घटक: प्रमाणित बियाणे निवड
- पीक प्रकारामध्ये:कडधान्य निवडा
- आता पीक निवडा
- Seed Age निवडा आणि क्षेत्र निवड
- सर्व माहिती save करा
- आता Home page वर या आणि “अर्ज सादर करा” वर क्लिक करा
- Final अर्ज Submit करा

महत्त्वाच्या लिंक ज्यांची तुम्हाला गरज पडेल
Maharashtra Farmer Registry -Farmer ID साठी

