शेती शाळा • महाराष्ट्र कृषी योजना, पीक सल्ला व CSC सेवा पोर्टल
शेती शाळा
SHETI SHALA
शेती शाळा • कृषी व योजना पोर्टल
शेतकरी योजना
⏱️ 13 मिनिटे वाचन वाचण्याचा वेळ

Sheli palan yojana 2026 maharashtra – 5 शेळी 1 बोकड, 10 शेळी 1 बोकड

Pravin
प्रमाणित कृषी व CSC मार्गदर्शक
📅 प्रकाशित: 17 September 2026
🔄 अपडेट: 18 October 2026
Pashusamvardhan Vibhag | पशुसंवर्धन विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 5 शेळी 1 बोकड | 10 शेळी 1 बोकड

9 मार्च 2026 च्या जीआरनुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आणण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत 5 शेळी 1 बोकड आणि 10 शेळी 1 बोकड गटाबाबतची माहिती, पात्रता, अनुदान, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया येथे पाहूया.

9 मार्च 2026 GR नुसार योजना
लाभार्थी शेतकरी, भूमिहीन, महिला बचत गट
अनुदान 50% आणि 75%
Online Application ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
01

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना Mukhyamantri Gramin Pashudhan Udyogjakta Yojana 2026

राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून 9 मार्च 2026 च्या जीआरनुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आणण्यात आलेली आहे.

या योजनेच्या अंतर्गत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे दोन प्रकारामध्ये योजनांचे वर्गीकरण करून या योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

राज्यस्तरीय योजनेमध्ये मोठ्या गटांच्या योजनांबद्दल यापूर्वी माहिती घेण्यात आली आहे. यामध्ये पाच गाई-म्हशी, 50 शेळ्या-पाच बोकड किंवा 5000 कुकुट पक्षी अशा योजनांचा समावेश आहे.

02

जिल्हास्तरीय योजना District Level Pashudhan Scheme

5 शेळी + 1 बोकड 5 Goat + 1 Buck Unit

  • 5 शेळी एक बोकड गट
  • त्याचा विमा
  • भूमिहीन लाभार्थ्यांसाठी योजना

10 शेळी + 1 बोकड 10 Goat + 1 Buck Unit

  • 10 शेळी एक बोकड गट
  • त्याचा विमा
  • जमिनीची अट लागू
03

कोणाला लाभ मिळणार? Eligibility | Beneficiaries

भूमिहीन लाभार्थी

भूमिहीन लाभार्थ्यांना 5 शेळी + 1 बोकड गटाचा लाभ दिला जाणार आहे.

अल्पभूधारक शेतकरी

अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून समावेश आहे.

महिला बचत गट

महिला बचत गटांचाही या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून समावेश आहे.

अत्यल्प भूधारक शेतकरी

अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचाही योजनेमध्ये लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

04

जमीन किती आवश्यक आहे? Land Requirement for Goat Farming Scheme

5 शेळी + 1 बोकड

जमिनीची अट नाही

5 शेळी + 1 बोकड गट घ्यायचा असेल तर भूमिहीन लाभार्थ्यांसाठी जमिनीची कुठलीही अट नाही.

10 शेळी + 1 बोकड

जमीन आवश्यक

लाभार्थ्याकडे कमीत कमी स्वतःची एक एकर जमीन किंवा पाच वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन असावी लागणार आहे.

05

महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी आरक्षण Reservation | Women & Persons with Disability

गट / Unitआरक्षण
5 शेळी + 1 बोकडमहिलांसाठी 50%
5 शेळी + 1 बोकडदिव्यांगांसाठी 5%
10 शेळी + 1 बोकडमहिलांसाठी 30%
06

शेळी पालन प्रशिक्षण आणि अनुभव Goat Farming Training & Experience

पशुपालन व्यवसायाचे शासकीय नियम आणि शासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहणार आहे.

यासोबतच दोन वर्षांचा शेळी-मेंढी पालन व्यवसायाचा अनुभव असावा.

07

शेळी आणि बोकडाची किंमत Goat Farming Unit Cost

घटककिंमत
शेळी₹12,000
बोकड₹15,000
मेंढी₹12,000
मेंढा₹15,000
विमा12.75%
विक्री कर18%
₹86,284

5 शेळी + 1 बोकड
किंवा 5 मेंढी + 1 मेंढा

₹1,55,311

10 शेळी + 1 बोकड

08

किती अनुदान मिळणार? Goat Farming Subsidy Percentage

50%

सर्वसाधारण / General

75%

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती

09

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेसाठी कागदपत्रे Documents Required | Required Documents

स्वतःच्या नावाचा सातबारा
5 वर्षांचा भाडेपट्टा करार
भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र
वनहक्कधारकांसाठी संबंधित नोंद / प्रमाणपत्र
पशुपालन व्यवसायाचे प्रमाणपत्र
प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र
दिव्यांगांसाठी UDID Card
बचत गटाच्या सदस्याचे प्रमाणपत्र
10

अर्ज प्रक्रिया कशी असणार? Online Application Process

01

पशुसंवर्धन विभागाची जाहिरात

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जाहिरात काढली जाईल आणि अर्ज करण्याचे आवाहन केले जाईल.

02

Online Application

योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

03

लाभार्थी निवड

आलेल्या अर्जांमधून Random पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

04

पुढील प्रक्रिया

पात्र लाभार्थ्याची निवड करून या योजनेअंतर्गत पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत.

11

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेच्या अटी Important Conditions & Rules

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे.

त्यामुळे रेशन कार्ड आवश्यक असणार आहे.

शासनाच्या इतर विभागातील समान योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

समान योजनेचा लाभ घेतलेला नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र द्यावे लागेल.

शासकीय नोकरीतील निवृत्ती वेतनधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मागील तीन वर्षांत इतर शासकीय संस्था, विकास मंडळ, महामंडळ किंवा मंडळाकडून लाभ घेतलेला नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र द्यावे लागेल.

12

अनुदान कोणत्या खात्यात जमा होणार? DBT Linked Bank Account

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान फक्त आणि फक्त लाभार्थ्याच्या DBT संलग्न बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे.

13

व्यवसाय सुरू ठेवण्याबाबतचे बंदपत्र Business Continuation Undertaking

लाभार्थ्याकडून यासंदर्भातील बंदपत्र घेतले जाणार आहे. लाभार्थी हा व्यवसाय पुढे करेल आणि ताबडतोब शेळ्या वगैरे विकणार नाही, याबाबत बंदपत्र घेतले जाणार आहे.

तसेच तीन वर्षांपर्यंत हा व्यवसाय केला जाईल, याबाबतचे बंदपत्र देखील घेतले जाणार आहे.

14

5 शेळी 1 बोकड आणि 10 शेळी 1 बोकड योजना Goat Farming Scheme Maharashtra – Summary

अशाप्रकारे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत जिल्हास्तरीय योजनामध्ये 5 शेळी 1 बोकड किंवा 10 शेळी 1 बोकड गटवाटप योजना राबवली जाणार.

यामध्ये लाभार्थी पात्रता, जमीन, आरक्षण, प्रशिक्षण, कागदपत्रे, अनुदान, ऑनलाइन अर्ज आणि लाभार्थी निवडीबाबत हि सगळी माहिती आपण वर दिली आहे.

15

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न Frequently Asked Questions

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना काय आहे?

9 मार्च 2026 च्या जीआरनुसार पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आणण्यात आलेली आहे.

5 शेळी 1 बोकड योजना कोणासाठी आहे?

5 शेळी + 1 बोकड गट भूमिहीन लाभार्थ्यांसाठी राबवला जाणार आहे. अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि महिला बचत गटांचाही लाभार्थी म्हणून समावेश आहे.

5 शेळी 1 बोकडसाठी जमीन आवश्यक आहे का?

5 शेळी + 1 बोकड गटासाठी भूमिहीन लाभार्थ्यांसाठी जमिनीची कुठलीही अट नाही.

10 शेळी 1 बोकडसाठी किती जमीन आवश्यक आहे?

कमीत कमी स्वतःची एक एकर जमीन किंवा पाच वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन असणे आवश्यक आहे.

General प्रवर्गाला किती अनुदान आहे?

सर्वसाधारण / General प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदान आहे.

SC आणि ST लाभार्थ्यांना किती अनुदान आहे?

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75% अनुदान आहे.

महिलांसाठी किती आरक्षण आहे?

5 शेळी + 1 बोकडसाठी महिलांना 50% आणि 10 शेळी + 1 बोकडसाठी महिलांना 30% आरक्षण लागू राहणार आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जाहिरात काढली जाईल आणि त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.

लाभार्थ्यांची निवड कशी होणार?

आलेल्या अर्जांमधून Random पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

एका कुटुंबातील किती व्यक्तींना लाभ मिळणार?

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

5 शेळी 1 बोकड | 10 शेळी 1 बोकड योजना

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय योजनामध्ये 5 शेळी 1 बोकड आणि 10 शेळी 1 बोकड गटाबाबत माहिती देण्यात आली आहे. पात्रता, जमीन, अनुदान, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची माहिती वरीलप्रमाणे पाहता येते.

WhatsApp Group नवीन अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवा
Join Now

⚠️ अस्वीकरण (Disclaimer)

Sheti Shala (Proranker.in) हे एक स्वतंत्र आणि खाजगी शैक्षणिक ब्लॉग आहे. याचा कोणत्याही सरकारी विभागाशी, महाडीबीटी (MahaDBT) किंवा CSC पोर्टलशी अधिकृत संबंध नाही. आम्ही दिलेली सर्व माहिती अधिकृत GR आणि वृत्तपत्रांच्या आधारे वाचकांच्या सोयीसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी कृपया संबंधित योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर माहितीची खात्री करा.

संबंधित विषय (Tags):

Pravin - ProRanker Author

Pravin

महाराष्ट्र कृषी व CSC डिजिटल सेवा मार्गदर्शक

लेखक

ProRanker.in आणि Sheti Shala वर शासकीय योजना, कृषी सेवा, Farmer ID, MahaDBT, 7/12 आणि डिजिटल सरकारी सेवांची माहिती सोप्या भाषेत मांडतात. Digital content creation मध्ये 5+ वर्षांचा अनुभव.

कृषी शासकीय योजना Farmer ID MahaDBT CSC सेवा
✓

या लेखातील माहिती संबंधित अधिकृत स्रोतांच्या आधारे तपासून आणि वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली जाते.

आमच्या शेतकरी कुटुंबात सामील व्हा! 🌾

सरकारी योजना, पीक विमा, आणि कृषी विषयक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. हा लेख इतर बांधवांना शेअर करायला विसरू नका.

याच कॅटेगरीमधील महत्त्वाचे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *